महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी शशिकांत निमसटकर यांची निवड
मारेगाव वार्ता प्रतिनिधी/ पंकज नेहारे
यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्ह्यातील१६ तालुक्या पैकी१३ तालुक्यातील तालुका अध्यक्षांनी उपाध्यक्ष, सचिव यांनी बहुमताचा पाठिंबा दिल्याने महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी मा.शशिकांत निमसटकर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. मारेगाव तालुका अध्यक्ष सुरेश येरमे, वणी तालुका उपाध्यक्ष विकास चिडे, दारव्हा सचिव किरण मोरे बाभूळगाव तालुका अध्यक्ष आशिष आकडे,पुसद कोतवाल संघटना,आर्णी तालुका अध्यक्ष अमोल लोंढे ,नेर तालुका अध्यक्ष रमेश घुगे,
राळेगाव तालुका अध्यक्ष.पी.व्ही. सावरकर ,दिग्रस.तालुका उपाध्यक्ष श्रीमती शारदा गायमुखे, उमरखेड तालुका अध्यक्ष शेख. कलीम शेख.मदार झरी तालुका अध्यक्ष षण्मुखानंद कांबळे,
कळंब तालुका अध्यक्ष मनोज पवार,यवतमाळ तालुका अध्यक्ष पंकज जाधव यांनी पाठिंबा दिला असल्याने जिल्हा अध्यक्ष पदी शशिकांत निमसटकर यांची निवड अविरोध करण्यात आली आहे. शशिकांत यांची निवड अविरोध होताच मारेगाव वार्ताशी बोलताना सांगितले की कोतवालांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे कोतवालाची कुठलीही समस्या असल्यास ते सोडवण्याचा मी प्रयत्न करले.