Type Here to Get Search Results !

वृक्षप्राधिकरण समिती नपची बैठक संपन्न नगराध्यक्ष व सदस्य यांची ऑक्सिजन पार्कला भेटपरतवाडा

वृक्षप्राधिकरण समिती नपची बैठक संपन्न 
नगराध्यक्ष व सदस्य यांची ऑक्सिजन पार्कला भेट

परतवाडा:-प्रतिनिधी

   बऱ्याच महिन्यांपासून रखडलेली वृक्षप्राधिकरण समितीची बैठक  दिनांक १४ जून २०२१ रोजी वृक्षप्राधिकरण समितीच्या अध्यक्ष सौ सुनीता फिसके,उपाध्यक्ष शशिकांत जयस्वाल, नप सदस्य सौ छाया भागवत,नप सदस्य गोवर्धन मेहरे, सदस्य तथा आदिवासी पर्यावरण समितीचे योगेश खानजोडे, अभियंता रमेश तायडे, निशांत मिश्रा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
          वृक्षांचे संगोपन, संवर्धनासाठी वृक्षप्राधिकरण समिती सदस्य योगेश खानजोडे यांनी जोर लावून धरला होता, नगराध्यक्षा सौ सुनीता फिसके व उपाध्यक्ष शशिकांत जयस्वाल व मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला,त्याची फलश्रुती
आज वृक्षप्राधिकरण समितीची बैठक नप अचलपूर येथे संपन्न होऊन पुढील विषयांचे निराकरण करण्यात आले
        जुळवा शहरातील धोकादायक वृक्षांची पाहणी करून छटाई करीता परवानगी देणे, 2016 ते 2020 मध्ये लावलेल्या वृक्षांचे जिवंत संख्या यांची माहिती घेणे, संगोपन व संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत माहिती व ठराव घेणे, जुळ्या नगरीतील वृक्षांची वृक्षगणना करून नप अचलपूर मध्ये वृक्षांची नोंद घेणे, अमृतयोजना अंतर्गत तयार पण दुर्लक्षित 20 बागबगीचे यांच्या कडे विशेष लक्ष देऊन उद्यान वाचविण्यासाठी प्रयत्न करणे व वृक्ष कटाई करिता मागण्यात आलेल्या परवानगीची दखल घेऊन धोकादायक वृक्षांना कटाई करीता परवानगी देऊन, प्रती झाड एक हजार डिपॉझिट घेऊन व एका झाडाबद्दल तीन झाडे लावून घेणे.
         सदर विषयावर आज वृक्षप्राधिकारण समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यात विशेष चर्चा झाली असून सर्व विषय निकाली काढण्यात येतील असे यावेळी  सांगण्यात आले
          ततपश्चात नगराध्यक्ष सौ सुनीता फिसके व नगर सेविका सौ छाया भागवत यांनी योगेश खानजोडे व संजय डोंगरे यांच्या सह सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद अचलपूर, आदिवासी पर्यावरण संयुक्तिक निर्मित ऑक्सिजन पार्कला भेट दिली.तेथिल सर्व 3.5 एकर मधील लागवड करण्यात आलेल्या 1250 विविध देशी पण प्राणवायू स्रोत वृक्षांची पाहणी करून आनंद व्यक्त केला, सर्व परिसर पाहून सदर ऑक्सिजन पार्क हा तालुक्यातील सर्वात मोठा ऑक्सिजन पार्क म्हणून अस्तित्वात आणला त्या बद्दल आदिवासी पर्यावरण चमुचे अभिनंदन करण्यात आले, व भविष्यात न प अचलपूर कडून जी काही मदत शक्य असेल ती नक्की करून जुळ्या नगरीला एक सुंदर पर्यावरण देऊ अशी नगराध्यक्षा सौ सुनीताताई फिसके यांनी ग्वाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies