गुरुकुल कॉन्व्हेंट, मुकुटबन च्या तनवी देवधगले, ऍना पुनवटकर चे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत देदीप्यमान सुयश
दोन्ही ही वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या अंतर्गत माहे डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत स्थानिक गुरुकुल कॉन्व्हेंट, मुकुटबन च्या वर्ग दहावीच्या विद्यार्थीनी कु तनवी विलास देवधगले व ऍना अविनाश पुनवटकर यांनी उत्तीर्ण होऊन देदीप्यमान यशाला गवसणी घातली. या देदीप्यमान यशामुळे त्यांनी शाळेच्या प्रगतीत पुन्हा एक मानाचा तुरा रोवला.झरी
जामनी या आदिवासी बहुल मागासवर्गीय तालुक्यातील या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण होऊन शाळेसोबतच तालुक्याचा सुद्धा गौरव वाढविला आहे. तनवी विलास देवधगले व ऍना अविनाश पुनवटकर यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि शिक्षकांचे उल्लेखनीय मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन केले. या अगोदर ही प्रत्येक वर्षी या शाळेचे अनेक विद्यार्थी इयत्ता दहावी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत , शिष्यवृत्ती पात्रता तसेच गुणवत्ता यादीत, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत, इलेमेंट्री आणि इंटरमीजीयट ड्रॉयिंग परीक्षेत आणि शासनाने घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये झळकले ही एक वैशिष्ट्य पूर्ण बाब आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना देदीप्यमान यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष गजभिये सर, इंग्रजी शिक्षक आशिष साबरे, विज्ञान शिक्षक वनकर सर, चहारे सर, वैद्य मॅडम इत्यादीं शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. दोन्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष गजभिये सर, सर्व शिक्षकवृंद, आई वडील व शाळेच्या व्यवस्थापणाला दिले. शाळेच्या तसेच संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक श्री गजभिये सर यांनी दोन्ही विद्यार्थींनिं चे अभिनंदन केले.