Type Here to Get Search Results !

२१ वर्षीय बेपत्ता युवकांचा विहिरीत आढळला मृतदेह.

२१ वर्षीय बेपत्ता युवकांचा विहिरीत आढळला मृतदेह.


 औरंगाबाद तालुक्यातील गोलटगाव येथील बेपत्ता २१ वर्षीय युवकांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने त्याचा मृतदेह रविवारी आढळून आल्याने धक्कादायक घटना घडली आहे. 
अजय राजू अबिलढगे वय २१ रा.गोलटगाव ता.जि. औरंगाबाद असे विहिरीत  मृतदेह आढळून आलेल्या युवकांचे नाव आहे. 

 सदर घटनेची करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोलटगाव येथील २१वर्षीय युवक अजय राजू अंबिलढगे हा त्यांच्या  घरातून गुरुवारी रात्री साडेअकरा  वाजेपासून काही न सांगता निघून गेला होता त्यानंतर तो  काही वेळानी घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा गावात व परिसरात शोध सुरू केला तसेच दुसऱ्या दिवशी नातेवाईक यांनी ही परिसरात शोध घेत बेपत्ता असल्याचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून शोध घेत चालू असताना रविवार दिनांक २७ जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह गोलटगाव येथील एका विहिरीत मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली.  सदर मृतदेह नातेवाईकांनी बाहेर काढून औरंगाबाद घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येऊन त्यानंतर त्यांच्या अंत्यविधी गोलटगाव येथे करण्यात आला.  सदर घटनेचा तपास बिट जमादार पांडुरंग चव्‍हाण हे करत आहे या घटनेची  अकस्मात मृत्यूची करमाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies