लग्नाचे आमिष दाखवून नराधमाचा विवाहितेवर बलात्कार
गेवराई तालुक्यातील नराधमाने बलात्कार केल्याची घडली घटना
केज : केज तालुक्यातील एका २९ वर्षीय विवाहितेवर तिच्या मुलांना सांभाळतो व तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या पेक्षा वयाने लहान असलेल्या गेवराई तालुक्यातील नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
केज तालुक्यातील सांगवी (सारणी) येथील एका २९ वर्षीय विवाहितेची ऊसतोडणीच्या कामातून गेवराई तालुक्यातील काजळवाडी येथील भाऊसाहेब लक्ष्मण आंगुडे या (२७ वय) याच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा भाऊसाहेब आंगुडे याने गैरफायदा घेऊन त्या पीडित महिलेला तिच्याशी लग्न करतो व तुझ्या मुलांचा सांभाळ करतो; म्हणून तिच्यावर नेकनूर येथील डीटीएड कॉलेजच्या समोर असलेल्या पत्र्याच्या खोलीत तिच्या इच्छे विरुद्ध शारीरिक संबंध केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला, मुलांना व तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान पीडित महिलेने ता.२८ जून रोजी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नराधम भाऊसाहेब आंगुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन याच्या मार्गदर्शनाखाली युसूफ वडगाव पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सीमा कोळी या पुढील तपास करत आहेत.