शेतमालकानेच केला सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग
घोडधरा येथील घटना
प्रतिनिधी /पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील घोलधरा येथे सालगड्याच्या घरी घुसून पत्नी एकटीच असल्याचे पाहून सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना शनिवार दि. २६जुन रोजी दुपारी दोन वाजता घडली असुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सालगडी शेतामध्ये काम करत असताना सालगड्याच्या घरी डब्बा आणण्यासाठी गणेश जीवतोडे हा गेला असता सालगड्याच्या पत्नीचा मोबाईल चार्जिंगला लावून असलेल्या खोलीमध्ये जाऊन चार्जिंगला असलेल्या मोबाईल काढुन घेतला. सालगड्याची पत्नी मोबाईल मागण्यांसाठी गेली असता तिला खाली पाडून विनयभंग केल्याची तक्रार पिडीत महिलेने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये सोमवार दि.२८जुन रोजी सांयकाळी दाखल केली. तक्रारी वरुन संशयित आरोपी गणेश आनंद जीवतोडे वय वर्षे (४५)रा घोडधरा यांच्या विरुद्ध कलम३५४/४५२/५०६ सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस तपास करत आहे.