Type Here to Get Search Results !

मारेगाव तालुका बिरसा क्रांती दलाच्या तालुकाध्यक्ष पदी अनिल गेडाम ! -


   मारेगाव तालुका बिरसा क्रांती दलाच्या तालुकाध्यक्ष पदी अनिल गेडाम !
 - संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
      मारेगाव  :  दीपक डोहणे 
     आदिवासी समाजाला कँडरबेस संघटनेची गरज लक्षात घेता मारेगाव तालुक्यात बिरसा क्रांती दलाची स्थापना करण्यात येवुन मारेगाव तालुका अध्यक्षपदी अनिल उत्तम गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
      आदिवासी समाजाचे हीत लक्षात घेवुन समाजातील  सामाजिक,राजकीय ,सांस्कृतिक,
शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तनाची नांदी घडविण्यासाठी वैचारिक व कँडरबेस संघटनेची निर्मिती आज काळाची गरज आहे.अलीकडेच बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय दुरापास्त झाल्याचे विदारक वास्तव आहे.धर्माँद शक्तीचा उदय हा बहुजन वर्गाला खाईत लोटण्याचा प्रयत्न  लोकशाहीला घातक ठरत असुन आता समाजातील वैचारिक ऐक्याची निर्मितीच एकमेव पर्याय समाजाला सकारात्मक दिशा दाखविण्यासाठी  व कँडरबेस संघटनेची बांधणी अनिवार्य असतांना तालुका पातळीवर बिरसा क्रांती दलाची स्थापना करण्यात आली.
       मारेगाव तालुक्यापासुन या संघटनेची मुहूर्तमेढ रोवुन बिरसा क्रांती दलाच्या तालुका अध्यक्ष म्हणून अनिल गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संस्थापक अध्यक्ष  दशरथ मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत गेडाम यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिनेश अम्बुरे,प्रदेश  महासचिव प्रमोद घोड़ाम,जिल्हाध्यक्ष कैलास बोके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तालुक्यातील कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष अनिल गेडाम यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies