आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बापानेच मुलीवर चाकूने केला हल्ला
आर्णी/प्रतिनिधी
जन्मदात्या दादाराव सिताराम माटाळकर वय वर्षे (५१) हल्लेखोर पित्याचे नाव आहे. सागर आणी शुभांगीचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते मात्र दोघांच्याही जाती वेगवेगळ्या असल्याने घरातून विरोध होता काही दिवसांपूर्वी या दोघांनी पळून जावून विवाह केला होता. शुभांगीचे वडील दादाराव यांनी हा राग मनात धरून ठेवला होता. नुकतेच हे शुभांगीच्या वडीलांना गावात आल्याची माहिती मिळताच सासऱ्याने जावयाचे घर गाठून धारदार चाकूने जावयाचे व मुलीच्या पोटावर व पायावर हातावर खांद्यावर वार केले. या हल्ल्यात जावई व मुलगी गंभीर जखमी झाले. या बाबत तक्रार सागरचे काका नारायण अंभोरे यांनी आर्णी पोलीस स्टेशनला दिली. दादाराव माटाळकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपी याला अटक केली पुढील तपास आर्णी पोलीस करत आहे.