स्टॅम्प विक्री बंद असल्याने ब्लॅक मध्ये विक्री सुरू
शेतकऱ्यांची स्टॅम्प विक्रेत्या कडुन लूट जिल्हाधीकारी यांना निवेदन
वर्धा
जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाराज
अल्लीपुर . . क्रॉप लोन केस करण्यासाठी स्टेट बँक व इतर बँक मध्ये शेतकऱ्यांना स्टँम्प पेपर लागत असल्याने
लॉकडाऊन मुळे तहसील कार्यालय हिंगनघाट मधील स्टँम्प पेपर विक्री केंन्द बंद असल्याचे सांगत . स्टँम्प विक्रेते घरून जास्त दराने स्टँम्य विक्री करीत आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांची कोरोना काळातही लूट होत असल्याचे दिसून येत आहे . याकड़े त्वरित लक्ष जिल्हाधीकारी यांनी देऊन तहसील कार्यालय मधील स्टँम्य विक्री केंन्द सुरू करावे असे निवेदन ग्रा . प . सदस्य सतीश काळे यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधीकारी यांना निवेदन देण्यात आले . व शेतकरी व नागरीकांची लुट त्वरित थांबवावे अशी मागणी निवेदनातू केली यावेळी उपस्थित सरपंच नितीन चंदनखेडे यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.