२२वर्षीय युवकाने केला ६० वर्षाच्या महिलेवर अत्याचार
घुग्गूस येथील घटना
घुग्गूस शहरातील शांतीनगर येथे राहणाऱ्या एका साठ वर्षीय महिलेवर २२ वर्षिय युवकाने अत्याचार केल्याची घटना ४जुन रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपी हा ६०वर्षीय महिलेच्या घराशेजारी मदरसा असल्याने तो जात होता. त्याचे नाव मोहम्मद यासिन नूर (२२)हा चंद्रपूर रस्त्यावरील सत्संग नगर वॉर्डात भावजी कडे एक महिन्या पासून
राहत होता.व तो पंधरा दिवसापासून शांतीनगर येथील मदरसा मध्ये विद्यार्थ्याना उर्दू शिकविण्यासाठी जात असल्याचे सांगितले जात असल्याने.तसेच त्याला अश्लील व्हिडीओ पाहण्याची सवय जळल्यामुळे तो घटनेच्या दिवशी अश्लील विडियो पाहत शांतीनगर येथे पहाटे ४.३० वाजता दरम्यान गेला मदरसा येथे नमाज पडून बाहेर आला.व एक महिला , शौचालयाला जात असल्याचे पाहुन मोहम्मद यासिम नुर याने महिलेचा हात पकडून खाली पाडले वासनाधिन झालेल्या युवकाने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला महिलेने आरडाओरडा करत संशयित आरोपी तिथून पोबारा झाला . महिलेने पोलीस स्टेशन गाठून युवका विरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार कलम३७६,५०६ अन्वये गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मेघा गोखरे करीत आहे