Type Here to Get Search Results !

मारेगाव तालुक्यात कोरोना रुग्णांचा फुलस्टॉप !- शहरही निरंक


आज मारेगाव तालुक्यात कोरोना रुग्णांचा फुलस्टॉप  !
शहरही निरंक
     मारेगाव : सचिन मेश्राम 
      मारेगाव तालुक्याची कोरोना मुक्तीची समीप घटका जवळ येवू लागल्याचे संकेत आहे.आज शुक्रवारला तालुक्यातील ग्रामिण भागासह मारेगाव शहराला निरंक ठेवत मोठा दिलासा मिळाला आहे.
     मागील दोन महिन्यापासून कोरोना संसर्गजन्य रोगाने नागरिकांचे जिवन प्रभावित झाले होते.अनेकांना कोरोनाने बाधीत करुन बहुतांश नागरिकांना जीव गमवावा लागला.दरम्यान तब्बल दोन महिन्याच्या प्रदीर्घ कालावधी नंतर रुग्ण संख्येत कमालीची घट होत आज रुग्णांचा आकडा तालुक्यातील ग्रामिण भागासह शहरात निरंक आला.त्यामुळे तालुकावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    परिणामी आज शहरासह तालुक्याला बाधितांचा भोपळा मिळाला असला तरी अँक्टिवची संख्या ४८ वर आहेत.तर बरे होवुन घरी परतलेल्यांची संख्या १८ आहे.शासनाकरवी लॉकडाऊण व संचारबंदीचे निर्बंध हटविले व तालुक्यातील बाधितांची संख्या रोडावूंन आज नकोशी झाल्याचे चित्र मागील चार दिवसापासून असल्याने शहरात बाजारपेठ फ़ुलून वर्दळ वाढली आहे.असे असले तरी जनतेंनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies