Type Here to Get Search Results !

अर्धापूर पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलिस शिपायाच्या आरोपाने खळबळ

 अर्धापूर पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलिस शिपायाच्या आरोपाने खळबळ

महिला पोलिस शिपायावर बलात्कार करुन मारहाण केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल


वाशिम : वाशिम : वाशिममधील महिला पोलिस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीचा गैरफायदा घेत घरी येऊन पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलिस करत आहेत.
आरोपी अर्धापूर ठाण्यात पोलिस निरीक्षक
स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस शिपायावर बलात्कार करुन मारहाण केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक आहेत. त्यांच्यावर कलम ३७६ सह विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ओळखीचा गैरफायदा घेत 
वाशिमच्या मालेगाव पोलिस ठाण्यात आरोपी विश्वकांत गुट्टे २००७ मध्ये पीएसआय पदावर कार्यरत होते. त्यावेळी तक्रादार महिला पोलिस कर्मचाऱ्याची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत ३० मे २०२१ रोजी वाशिममध्ये आरोपी गुट्टे आपल्या घरी आले आणि त्यांनी जबरदस्ती करत बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी दि ३जुन रोजी वाशिम शहर पोलिसांत ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करत असल्याचे पोलिस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितले. पोलिस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies