Type Here to Get Search Results !

रोग दुरुस्त करणारी अतेंद्रीय शक्ती कुणातच नसते - पंकज वंजारे

रोग दुरुस्त करणारी अतेंद्रीय शक्ती कुणातच नसते - पंकज वंजारे  

जागतिक महामारी आणि अंधश्रद्धा विषयावर व्याख्यान संपन्न

                   .वर्धा
     जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन

अमरावती - मंत्राच्या, अतेंद्रीय शक्तीच्या आधारे तसेच वेगवेगळे अघोरी कृत्य, कर्मकांड करून कोरोना दुरुस्त होतो. या दाव्यावरील आंधळ्या विश्वासानेच अनेकांचे बळी घेतले. आम्ही कोरोना दुरुस्त करतो. असा दावा करणारे बाबा , मांत्रिकच स्वतःला वाचवू शकले नाही. रोग दुरुस्त करणारी अतेंद्रीय शक्ती कुणातच नसते.न घाबरता सावधगिरी आणि वैदकिय उपचारांचा अवलंब करा , असे जाहीर आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य युवा संघटक तथा प्रसिद्ध युवा वक्ते पंकज वंजारे यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक- युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित 'जागतिक महामारी आणि अंधश्रद्धा'  विषयावर ते बोलत होते.
पंकज वंजारे पुढे म्हणाले की , कोरोनाच्या भीतीचा उपयोग करत , दैवीशक्ती तुमची सुरक्षा करेल अस वेगवेगळ्या संदर्भात सांगून, जगभ-यात जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. यातून वैद्यकीय उपचारावर दुर्लक्ष होत अनेकांचे बळी गेले, जातील . हे थांबण्यासाठी शासकीय व सामाजिक स्तरावर जनजागृतीचे संयुक्त प्रयत्न होणे गरजेचे आहे, अस ते म्हणाले . पंकज वंजारे यांनी विविध धर्मातील मान्यतेच्या आधारे कोरोना महामारीतील पसरलेल्या आधुनिक अंधश्रध्दांच्या निर्मितीची कारणे सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा यांच्या विविध अभंग , लिखाणाचा संदर्भ देत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वक्तृत्व शैलीतून त्यांचे निर्मूलन केले. 
  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक- युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य फेसबुक पेज,  युट्यूब चॅनल, ट्विटर अकाऊंट वरून थेट प्रक्षेपित करण्यात आलेल्या या विशेष व्याख्यानाचे संचालन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक- युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य- वर्धा जिल्हा प्रवक्ता सुमित लता प्रकाश उगेमुगे यांनी केले.  हेमंतदादा टाले - अमरावती जिल्हा मार्गदर्शक आणि जान्हवी राऊत, राज्य उपाध्यक्ष - राष्ट्रसंत युवती विचार मंच यांनी संयुक्तपणे प्रास्ताविक केले. वक्तत्यांचा परिचय स्वप्निल सरडे देवळी ता. प्रवक्ता , तर आभार सिद्धी घाडगे , रायगड जिल्हा प्रवक्ता यांनी मानले. तंत्र साहाय्य  चेतन परळीकर, जिल्हा अध्यक्ष, वर्धा यांनी केले.
     या कार्यक्रमास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचारमंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमर वानखड़े, मुख्य सचिव विकास बोरवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचारमंच महाराष्ट्र राज्य अध्यक्षा साक्षी पवार, संघटक निलेश्वरी कळगुटकर, प्रवक्ते राज घुमनर, सुयोग राजनेकर, समाज माध्यम प्रमुख प्रतीक लोखंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यातील  युवक , युवती , नागरिक,  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक , कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात जुळले होते.
.......

कृपया बातमी प्रकाशित करावी ही विनंती.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक-युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies