अवैध रेती तस्करांच्या मारेगाव पोलीसांनी आवळल्या मुसक्या
मारेगाव तालुक्यात रेती तस्करी सुरुच
आठ व्यक्तींना अटक , ९ लाखाचा मुद्दे माल जप्त.
तालुका प्रतिनिधी/मारेगाव........
अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या रेतीतस्करांवर मारेगाव पोलिसांनी कारवाई करीत दोन ट्रॅक्टरसह आठ जणांना अटक केली असून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैध रेतीतस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
तालुक्यात शासनाचा महसूल बडवून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याच्या गुप्त माहीतीवरुन मारेगाव पोलीसांनी ता.२१ जुनच्या रात्री आठ वाजेदरम्यान सापळा रचत मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत रात्री अंदाजे आठ वाजेदरम्यान चोपण ते चनोडा या रस्त्यावर अंधारात दबा धरून बसले होते. त्याचवेळी दोन ट्रॅक्टर चनोडा या गावावरून चोपणकडे येतांना आढळले. तसेच ट्रॅक्टरच्या समोर दोन मोटरसायकल टेहळणी करण्यासाठी होत्या. यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्या दोघांना थांबविले. आणि ट्रॅक्टर थांबवून पाहणी केली असता दोन्ही ट्रॅक्टरमध्ये रेती आढळून आली.यात दोन ट्रॅक्टर, दोन मोटर सायकलसह ८ लाख ६९ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन प्रविण पुराणिक लोहे ,आनंद अशोक धोबे, राजकुमार नानाजी ढोके , अजय विलास शेरकी, शुभम पुंडलिक धोबे, समीर मारोती धोबे, रोहित मिश्रा,अंजील अनील ढोके सर्वजण शिवणी धोबे ता. मारेगाव येथील असुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले. पुढील तपास जमादार राजेंद्र टोंगे, विनेश राठोड, सुलभ ऊईके, करीत आहे.