बामर्डा पुलाची दयनीय अवस्था
मारेगाव : तालुक्यातील बामर्डा येथील पुल एक साईट खचल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
मारेगाव वार्ता
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील बामर्डा गावाला जोडणारा मुख्य पुल एक साईट पडल्याने. या पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या पुलाच्या रस्त्यावरून बामर्डा गावांतील ग्रामस्थ याच रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. परंतु, मागील काही वर्षांपासून बामर्डा पुलाची दुरवस्था झाली आहे. पुल एक साईट पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाते.
त्यामुळे वाहतूक बंद होते. याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. अनेकवेळा पूल दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या पुलाची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
बामर्डा पुलाची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. या पुलावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. पुलाचा काही भाग कोसळल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पुलाचे काम करून पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी धनंजय आसुटकर यांनी केली आहे.
पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात पूर आला की, पुलावरून ये-जा करता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने काम हाती घ्यावे. तसेच पुलाची उंची वाढवावी अशी मागणी धनंजय आसुटकर यांनी केली.