मारेगाव शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट
मारेगाव वार्ता
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव शहरातील काही भागामध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट असुन शहरातील दोन दुचाकी भुरट्या चोरांनी चोरून नेल्याच्या घटना घडली असल्याने एक लेआऊट मध्ये घर फोडून गहू तादुळ दाळ चोरून नेऊन कुलर व घरातील भाडे फेक फाक केल्याचे चित्र मारेगाव शहरात पाहावयास मिळाले असून मागील एक
महिन्यापुर्वी नगरपंचायत परिसरातील प्रभाग क्र.३मध्ये मागेच्या बाजूला शिवराम भोगेकर यांची स्प्लेडर प्लस एम एच २९. ए .जे.६५६४ घरा समोरील रोडच्या बाजुला झाडाच्या सावलीत उभी ठेवली होती भुरट्या चोरांनी चोरून नेली असल्याची घटना ताजी असताना सुभाष नगर परिसरातील दुचाकी चोरून नेण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडल्याने भुरट्या चोराचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे