Type Here to Get Search Results !

अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत SIP Abacus वणी केंद्राचे विद्यार्थी चमकले.!

अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत   SIP Abacus  वणी केंद्राचे विद्यार्थी चमकले.!

वणी येथील टिळक नगर येथे राहुल जैन आणि स्नेहा जैन यांनी संचालित केलेल्या एस आय. पी. अबॅकस च्या विद्यार्थ्यांनी आय. पी. अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी असून , घवघवीत यश संपादन केले आहे. सदर स्पर्धा तीन टप्यात ऑनलाईन पद्धतीने योजण्यात आली होती, पहिल्या टप्प्यात केंद्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यानंतर बेंचमार्क प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना राज्य स्तरावर संधी देण्यात आली होती.
 राज्यस्तरावरही SIP Abacus  वणी विद्यार्थ्यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली होती आणि २४ विद्यार्थ्यांनी पुरस्कार प्राप्त केला होता. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना  राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संधी मिळाली होती, या तिसऱ्या फेरीतही या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, सदर यशस्वी  विद्यार्थी या प्रमाणे आहेत. स्पर्धेत देशभरातून २६००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला
त्याचप्रमाणे वणी येथील दोन विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारत  यश संपादन केले आहे.
मानसी बडोदेकर (सुशगा पब्लिक स्कूल, वणी), सोनम वडकी (स्वरणलीला इंटरनॅशनल) या सर्व विद्यार्थ्यांचे  शाळांचे प्राचार्य , पालक, केंद्र प्रमुख राहुल जैन, आणि विभागीय प्रमुख प्रदीप शेंद्रे, वरिष्ठ विभागीयप्रमुख राजेंद्र नन्नवरे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies