Type Here to Get Search Results !

ग्राम संवाद सरपंच संघाच्या वणीतालुका अध्यक्षपदी अजय कवरासे

ग्राम संवाद सरपंच संघाच्या वणी
तालुका अध्यक्षपदी अजय कवरासे

युवा सरपंच अजय कवरासे चे नियुक्ती बद्दल तालुक्यात कौतुक

रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी

वणी: तालुक्यातील ढाकोरी येथील युवा सरपंच अजय पांडुरंग कवरासे यांची नियुक्ती
ग्राम संवाद सरपंच संघाच्या वणी
तालुका अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष
आजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद
भगत, सचिव विशाल लांडगे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विठ्ठल आडे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. 
अजय कवरासे नेहमी सामाजिक कार्य, राजकीय क्षेत्र यामध्ये मोलाची कामगिरी केली आहे. वणी तालुक्यात सर्वात कमी वयामध्ये सरपंच बनण्याचा मान त्याने  मिळविला आहे. त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याची वणी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या निवडीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 
ग्रामसंवाद सरपंच संघाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व सरपंच व सदस्यांची कार्यकारणी गठीत करून गाव विकासासाठी तालुकास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करून  मोठ्या प्रमाणात जनजागृती करू असे मत मारेगाव वार्ता न्युज सोबत बोलताना अजयने मांडले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies