डॉ. मनोज रामराव बडोदेकर यांची (IHRAO) च्या झरी तालुका अध्यक्ष पदी निवड
अखेर डॉ. मनोज रामराव बडोदेकर यांना कामाची पावती संघटनेने दिली.
प्रतिनिधी /संकेत गझलवार
झरी :– इंटरनॅशनल हुमन राईट अम्बेसेडर ऑर्गनाझेशन (IHRAO) च्या झरी तालुका अध्यक्ष पदी डॉ. मनोज रामराव बडोदेकर यांची निवड अध्यक्षपदी करण्यात आली डॉ. मनोज हे वैद्यकीय क्षेत्रात परिचित असे नाव तसेच त्यांची सेवा ही मुकुटबन येथे लोकांसाठी लाभदायक आहे अशी चर्चा सर्वत्र आहे.हसमूख व आप्त सम्बंध जपणारे व सर्वांसाठी कठीन प्रसंगी धाऊन जाणारे डॉ .मनोज यांची इंटरनॅशनल हुमन राईट
अम्बेसेडर ऑर्गनाझेशन ने त्यांचा कामाची दखल घेत त्यांना झरी तालुक्यातील अध्यक्ष पद बहाल केले.मागील एक वर्षातील लाॅकडाऊनच्या काळात, त्यांनी केलेली गोरगरिबांना मदत व सेवा तसेच लाॅकडाऊनच्या काळात उचलेला सामाजिक कार्याचा भार हा संपुर्ण तालुक्यात उल्लेखनीय असल्याचे बोलले जात आहे .
त्यामुळे डॉ. मनोज रामराव बदोडेकर यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यांची निवड हुमन राईट ॲब्ससार्डोस ऑर्गनाझेशन(IHRAO) चे जिल्हा अध्यक्ष प्रा.अजय कंडेवार यांनी केली अगनिक सुरु असलेला सामाजिक कार्याची परंपरा समोरही सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे . त्यांच्या या निवडीने संपुर्ण झरीतालुक्यातुन व मुकुटबन मित्राद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
डॉ. मनोज रामराव बडोदेकर (झरी तालुका अध्यक्ष)