Type Here to Get Search Results !

मारेगाव भारतीय जनता पक्षा तर्फे कोरोना योद्धाचा सन्मान

मारेगाव भारतीय जनता पक्षा  तर्फे कोरोना योद्धाचा सन्मान

 मारेगाव तालुक्यातील मारेगाव, मार्डी, वेगाव येथील कोविड सेंटर येथे  डाॅक्टर्स, परिचारीका  रुग्णवाहिका चालक यांचा वणी विधानसभेचे  आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते सन्मान

   प्रतिनिधी /पंकज नेहारे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण …
मारेगाव( ३१ मे )- संपूर्ण महाराष्ट्रात कोविड आजाराचे थैमान घातल्याने शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लाॅकडाऊन जाहिर केला आहे. या काळात जीवाची पर्वा न करता डाॅक्टर्स, परीचारीका, सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक  आपली सेवा २४तास देत असुन. मारेगाव तालुक्यातील.व मारेगाव शहरातील पुरके कोविड सेंटर ,वेगाव  व मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या,  डॉक्टर नर्स,  रुग्णवाहिका चालक सफाई कर्मचारी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार  यांनी भेट देवून.
यावेळी कोविड काळात रुग्ण तपासणी, विविध वयोगटातील नागरीकाचे लसीकरण, कोविड रुग्णांवर उपचार अशा सतत सेवा देणारे  डाॅक्टर्स व परीचारीका तसेच सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक वणी विधानसभेचे  आमदार  मा.संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे
डॉ अर्चना देठे  डॉ. रविना खैरकार फार्मासिस्ट नेहा मैडम  सफाई कामगार विनोद आत्राम खाजगी  रुग्णवाहिका चालक आकाश भेले यांचा शाल श्रीफल देऊन सन्मान करण्यात आला
याप्रसंगी कोविड लसीकरण व कोविड रुग्णाची माहिती घेतली तसेच नागरीकांना लसीकरण करुन घेण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या सुचना आमदार मा संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी दिल्या  नागरीकांनी न घाबरता लसीकरण करुन कोविड आजारापासून बचाव करण्याचे आव्हानही त्यांनी नागरीकांना केले.
    या प्रसंगी  संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, जिल्हा सचिव किशोर बावणे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, मारेगाव शहराध्यक्ष विलास चिंचुलकर व माजी नगरपंचायत उपाध्यक्ष प्रशांत नादे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies