Type Here to Get Search Results !

विज पडून दोन बैल ठार।

    विज पडून दोन बैल ठार।  
       सचिन महाराज
 हिंगणघाट तालुक्यातील_ मौजा बोपापुर येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात विज पडल्याने श्री रामदासजी खोडे मु. फुकटा, यांचे दोन बैल जागीच ठार झाले. सायंकाळी ६ ,३०  वाजच्या दरम्यान वादळी वारा विजेच्या  कडकडाट शेतामध्ये  बंड्याच्या कडेला बैल असल्याने बैलावर विज पडून जागीच  ठार झाले , शेतकरी  बंड्या मध्ये हजर होते , शेतकऱ्याचे प्राण वाचले ऐन पेरणीच्या हंगामात ह्या शेतकऱ्याचे जवळपास दिड ते पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी  शेतकऱ्याने मागणी केली आहे.गावातील सरपंच  उमाटे ,पोलीस पाटील  यांनी घटनास्थळी जावून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सचिन  खेमलापुरे, व भानुदास कुकर्डे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -1 पटवाडी यांनी पंचनामा केला ,वडनेर,पोलीस कर्मचारी प्रफुल चंदनखेडे पाहणी केली,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies