हिवरीचे सरपंच नंदु भाऊ बोबडे यांचे निधन
विकासरत्न सरपंच पडद्याआड हिवरी गाव बुडाले शोकसागरात
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील हिवरी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच नंदुभाऊ बोबडे यांची काही दिवसापासून तब्येत ठिक नसल्याने त्यांनी वणी येथे उपचार करून वणी येथी डॉ. यांच्या सल्ला नुसार नागपूर येते नंदुभाऊ बोबडे उपचार साठी गेल असता डॉ. यांनी तुम्ही आठ दिवस
आमच्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सल्ला नागपूर येथील डॉ . नंदुभाऊ बोबडे यांच्या वर उपचार सुरू असताना शनिवार दि.२२मे रोजी सायंकाळी अकरा
वाजताच्या अल्पशा आजाराने वयाच्या (५२) वर्षी निधन झाले. नंदुभाऊ यांची विकासरत्न सरपंच म्हणून त्यांची तालुक्यातील ओळख होती.त्याचे अचानक जण्याने हिवरी गाव बुडाले शोकसागरात बुडाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा त्यांच्या पाठीमागे आपत्य परिवार आहे.