सामाजिक कार्यकर्ते मिलिंद निकाळे यांचे निधन
विक्रोळी टागोर नगर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते , तक्षशिला मित्र मंडळाचे आधारस्तंभ व वनिता फाऊंडेशनचे खजिनदार मिलिंद निकाळे यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले ,आई दोन भाऊ बहीण असा परिवार आहे .विक्रोळी टागोर नगर येथील मिलिंद दामोदर निकाळे यांनी विक्रोळी टागोर नगर येथील बैठ्या चाळीचा पुनर्विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले होते .
तसेच आंबेडकर जयंती व इतर उपक्रमात ते हिरिरीने सहभाग घेवून अडलेल्या, नडलेल्या गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे सर्वांचे लाडके प्रेमळ असे मनमिळावू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्या आड गेल्याने विक्रोळी टागोर नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
विक्रोळी येथील ज्येष्ठ पत्रकार व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांचे ते मेहुणे होते .