खरीपपूर्व तयारीकरिता मृदा संवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापन या विषयावर युट्यूब लाईव्ह द्वारे मार्गदर्शन
प्रतिनिधी/यवतमाळ
रिलायंस फाऊंडेशन व पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी खरीपपूर्व तयारीकरिता मृदा संवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापन या विषयावर युट्यूबद्वारे दि. २९-०५-२०२१ रोजी मार्गदर्शन करण्यात आले.
शेतजमिनीची सुपीकता तिच्या वरच्या थरांतील मातीच्या सूक्ष्म कणांवर अवलंबून असते म्हणून त्याचे संवर्धन करणे ही महत्वाची बाब ठरते तसेच पाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीचा उतार,जमिनीचा प्रकार,जमिनीचा वापर व पाणी साठवण्यासाठी भूगर्भातील क्षमता इत्यादी बाबी लक्षात घेऊन तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या समस्या मांडत उत्तम प्रतिसाद दिला. युट्यूब प्रोग्राम मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला त्यांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर डॉ. किशोर घरडे सहयोगी प्राध्यापक मृद व जल संवर्धन अभियांत्रिकी विभाग,डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला तसेच डॉ. डी. एस कंकाळ सहाय्यक प्राध्यापक मृद विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकऱ्यांचे मनोबल वाढविले. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रफुल बन्सोड प्रकल्प व्यवस्थापक तसेच कार्यक्रम सहायक मनीष मेश्राम यांनी केले.