Type Here to Get Search Results !

मांगरूळ येथे आरओ प्लांटचे उद्घाटन

मांगरूळ येथे आरओ प्लांटचे उद्घाटन

मारेगाव तालुक्यातील : मांगरूळ  ग्रामपंचायतीला खनिज निधीतून दिलेल्या निधीतून आरओ प्लांटचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांच्या हस्ते 

       प्रतिनिधी/पंकज नेहारे

मारेगाव : मांगरूळ  ग्रामपंचायतीला दिलेल्या खनिज निधीतून उभारलेल्या आरओ प्लांटचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार  संजीवरेड्डी  बोदकुलवार यांच्या हस्ते करण्यात आले.  
 वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी आपल्या खनिज निधीतून दिलेल्या निधीतून मांगरूळ ग्रामपंचायतने उभारलेल्या या आरओ जलशुद्धीकरण प्रकल्पातून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पाच पाच रुपयाच्या काँईनचा  वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.  अवघ्या पाच रुपयात नागरिकांना दि.३०मे रोजी दुपारी तिन वाजता वणी विधानसभेच आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले  असुन पाच रुपया मध्ये१६ लीटर शुद्ध पाणी  देण्यात सुरुवात झाली असल्याची माहिती सरपंच जगदीश ठेंगणे यांनी यांनी दिली.
यावेळी उपस्थित  पंचायत समितीसभापती सौ शितल पोटे, उपसरपंच प्रमोद आत्राम ग्रामपंचायत सदस्य सौ. मिना डाखरे ,  ग्रामसेवक गोपाळ मसराम, व भाजप पदधिकारी  दिनकरराव पावडे, संजय पिंपलशेंडे, रवि बेलुरकर, नितीन वासेकर,गंजूभाऊ विधाते, संदीप बेसरकर, मारेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शहर अध्यक्ष विलासभाऊ चिंचुलकर, तालुका महामंत्री प्रशांत नांदे, शहर महामंत्री रविंद्र टोंगे समिर गेडाम यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies