Type Here to Get Search Results !

मांडवी शिवारात वाघाचा दोघांवर हल्ला एक गंभीर जखमी ,

मांडवी शिवारात वाघाचा दोघांवर हल्ला
एक गंभीर जखमी एकदा पुन्हा दहशती मध्ये शेतकरी

      झरीजामणी/ प्रतिनिधी

झरीजामणी तालुक्यातील मांडवी येथील बैलांना पाणी पाजण्यासाठी शेता शेजारी असलेल्या नाल्यावर  दोघांवर दळून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला त्यात सुधाकर मेश्राम (३२रा).बेल्लमपल्ली हा गंभीर जखमी झाला व दुसरा रामकृष्ण टेकाम(२२) रा .बेल्लमपल्ली हा जखमी आहे.वाघाने सुधाकरच्या मानेला पकडून त्या काही अंतरावर ओढत नेण्याचा प्रयत्न केला यात सुधाकर रामभाऊ मेश्राम यांच्या
 मानेवर व पायावर गंभीर जखमा झाल्या व रामकृष्ण कानूजी टेकाम यांने तेथून वाघाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तर  रामकृष्ण यांच्या वर येवून पडल्याने रामकृष्ण सैरभैरा पडत जात झाडावर चढत असताना  वाघाने रामकृष्ण यांचे पाय पकडून त्याला खाली पाडले शेजारी शेतकरी नाल्यावर पाणी बैलांना पाजण्यासाठी आणत  असताना  सुनील मेश्राम, राजू मेश्राम यांना दिसताच  आरडाओरडा केल्याने वाघ तेथून पोबारा केला जखमीना मांडवी पर्यंत बैलगाडी मध्ये आण्यात आले तेथून वन विभागाच्या गाडी मध्ये पांढरकवडा उप जिल्हा रूग्णालयात दाखल करून जखमीवर उपचार करून वैद्यकीय अधिकारी सुधाकर मेश्राम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथे हालविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies