वरोरा येथील आबिद शेख वर गोळीबार करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस ठोकल्या बेड्या
मारेगाव वार्ता/प्रतिनिधी वरोरा
वरोरा येथील आबिद शेख या युवकाची शनिवारी दि.१५मे रोजी सांयकाळी ७:३०च्या सुमारास तिन युवकांनी मिळून आबिद यांच्या वर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. घटनास्थळावरून मारेकर्यांनी पोबारा केला होता. मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेहावर शवविच्छेदन करणार नाही व मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका मृतकच्या कुटुंबीयांनी घेतल्याने वरोरा
उपजिल्हा रूग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेची गंभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तपासाची सुत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या सोपवली त्यानंतर तापसाची चक्रे वेगाने फिरून मारेकऱ्यांना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून ताब्यात घेतले देवा नौकरकर , गौरव वाळके, अशी पोलिसांनी अटक केलेल्या मारकऱ्यांची नावे आहेत. पंचायत समिती कार्यालय शेजारी अंबादेवी वार्डा लागत असलेल्या एका शेड मध्ये आबिद शेख हा आपल्या काही सहकाऱ्यासह तोडाला मास्क लावून बसला होता. त्याचवेळी देवा नौकरकर, गौरव वाळके हे दोन युवक आपल्या सहकाऱ्यांसोबत तिथे आले होते.आबिद शेख याच्यावर बंदूकी मधून गोळ्या झाडून आबिद शेख
हे गंभीररित्या जखमी झाले होते मारेकर्यांनी हत्येसाठी वापरलेली बंदूक एक दुचाकी जखमी जवळ सोडून गेले होते. पोलिसांनी बंदुक व दुचाकी जप्त केली जखमी अवस्थेत आबिद याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार सुरु करताच आबिद यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी मृतक घोषित केले. या घटनेची माहिती आबिद यांच्या कुटुंबांना व नातेवाईक यांना माहिती कळताच उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक करणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही व मृतदेह ताब्यात घेणार नाहीहे गंभीररित्या जखमी झाले होते मारेकर्यांनी हत्येसाठी वापरलेली बंदूक एक दुचाकी जखमी जवळ पोलिसांनी जप्त केली जखमी अवस्थेत आबिद याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार सुरु करताच आबिद यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी मृतक घोषित केले. या घटनेची माहिती आबिद यांच्या कुटुंबांना व नातेवाईक यांना माहिती कळताच उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक करणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही व मृतदेह ताब्यात घेणार नाही