मारेगाव तालुक्यात ३८ शहरात ०६ बाधीत
- ९३ जन झाले बरे!
मारेगाव : सचिन मेश्राम
.....................
मारेगाव तालुक्यात कोरोणाची आकडेवारीत चढउतार होतांना दिसत आहे.आज सोमवारला कोरोना रूग्ण संख्येत वाढ होवून तालुक्यातील बाधितांचा आकडा फुगत ३८ वर गेला.यातील मारेगाव येथील पॉझिटीव्ह ची संख्या अर्धाडझन च्या घरात आहे.९३ जनांनी कोरोनावर मात करीत घरी परतले आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाचा लपंडाव कमी जास्त प्रमाणात सुरु आहे.मागील दोन तीन दिवसातील रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती.आज सोमवारला पुन्हा डोके वर काढत बाधितांची संख्या ३८ वर गेली.यातील मारेगाव शहराची संख्येतही वाढ होत सहा वर गेली आहे.
दुसरीकडे रुग्ण संख्या बरे होण्याच्या प्रमाणात कमालीची घसरण होत आज ९३ जन घरी परतले.दरम्यान कोरोना संसर्गाच्या कमीजास्त प्रमाणातील लपंडावाने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे.