वणी शहरामध्ये अज्ञात पेट्रोल चोर टोळी सक्रिय
मारेगाव वार्ता
प्रतिनिधी :संजय नागपुरे
स्थानिक वणी शहरामध्ये पेट्रोल चे भाव शंभरी पार करून दिवसेंदिवस वाढतच असून त्यातल्या त्यात वणी शहरामध्ये पेट्रोल चोर टोळी सक्रिय होत चालली आहेत.
मध्यरात्री अडीच ते तीन च्या सुमारास या पेट्रोल चोर टोळीचा हौदोस वणी शहराच्या गल्लो गल्लीत बघावंयास मिळत आहेत.या बाबत सविस्तर वृत्त असे की वणी मधील रंगारीपुरा येथे राहणाऱ्या अमोल डोंगरे नामक व्यतिच्या होंडा शाईन MH -२९ BG -८२७९ या दुचाकीतून अज्ञात चोरांनी तीन ते पाच लिटर पेट्रोल लांब पाईप च्या सह्याने काढून पसारा झाल्याची घटना शनिवार १५ मे ला मध्यरात्री घडली.
सोबतच त्याचे शेजारील दोन दुचाकी वाहनाचे पेट्रोल सुद्धा अज्ञात चोरांनी काढून घटना स्थळावरून पसार झाले मात्र अस्या घटनाचा विरोध करून त्यावर आवर घालण्याच्या तयारीत मात्र अन्याय ग्रस्त व्यक्ती पोलीस स्टेशनं गाठाण्याच्या तयारीत दिसत नाहीत.शहरामध्ये सायकल चोरी, पेट्रोल चोरी अस्या घटना लाकडाऊन काळात मध्ये रात्रीच्या सुमारास घडू लागल्या आहेत.तरी पोलीस प्रशासनाने या कडे विशेष लक्ष घालून चोरट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी चर्चा रंगारीपुरा व वणीकर सर्वसामान्य जनतेची पोलीस प्रशासनाकडे अपेक्षा आहेत.