Type Here to Get Search Results !

ओव्हरलोड वाळू वाहतुकीने वरकमाईचा गोरखधंदा

ओव्हरलोड वाळू वाहतुकीने वरकमाईचा गोरखधंदा
- भुरकी ते यवतमाळ होतेय जडवाहतूक
- तात्काळ कारवाईची मनसेची मागणी,  आंदोलनाचा गर्भित इशारा
   मारेगाव : दीपक डोहणे
      मागील दोन महिण्या पासुन सुरु झालेल्या वणी तालुक्यातील रांगणा भुरकी वाळू घाटातुन थेट यवतमाळ कडे जाणाऱ्या वाहनातून ओव्हरलोड वाळू साठा राजरोसपणे सुरु असल्याने  वरकमाईचा गोरखधंदा सुरु आहे.या गोरखधंद्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने पारदर्शक चौकशी करून कारवाईचा बडगा उगारावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्मान सेना आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल असा गर्भित इशारा जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी वरिष्ठांना दिलेल्या तक्रार निवेदनातून दिला आहे.
      गत दोन महिन्यापासून जिल्ह्यातील वणी तालुक्यातील रांगना भुरकी वाळू घाट लिलाव करण्यात आला.या घाटातुन थेट यवतमाळ,पांढरकवडा येथे ट्रक,टिप्पर ने वाळुची वाहतूक होत आहे.सदर वाहनातून ओव्हरलोड प्रकार नित्याचाच बनला आहे.दिवस रात्र सुरु राजरोसपणे सुरु असलेल्या व ओव्हरलोड चालणाऱ्या वाहतुकीला ग्रीन सिग्नल नेमका कोणी दिला हा प्रश्न मात्र येथे अनुत्तरीत आहे.
    सदरील घाटातुन रेती उपसा करिता मजुरांना मात्र बगल देण्यात येवुन जेसिबी मशीन च्या सहाय्याने भरणा सुरु आहे.अशातच ही वाळू उपसा यंत्र तीन फुट खाली उपसा करीत आहेत.येथे शासनाचे नियम,अटी व शर्थी धाब्यावर बसवून पुर्णत: उल्लघन होत असतांना प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मुग गिळून आहे.वाहतूक मालकांनी हातमिळवणी करित ओव्हरलोड वाहतूक व रेतीसाठाचा गोरखधंदा राजरोसपणे चालविला असल्याने कारवाई साठी अधिकारी मात्र सपशेल कानाडोळा करित आपले इप्सित साध्य करित असल्याचा आरोप मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी वरिष्ठांना दिलेल्या तक्रार निवेदनातून केला आहे.याची सखोल व पारदर्शक चौकशी करुन कारवाई करावी अन्यथा मारेगाव तालुका मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल असा गर्भित इशारा दिला आहे.
   * मारेगाव तालुक्यात शेकडो ब्रॉस वाळू साठ्याकडे प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष *
     मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथे वाळू तस्करांनी हजारो ब्रॉस वाळूची साठवणुक केली आहे.चार दिवसापूर्वी मंडल अधिकार्यानी थातुरमातुर चौकशी करित अत्यल्प प्रमाणातील वाळू साठ्यावर कारवाई केली.अनेकांवर नोटीसा बजावून कारवाईची टांगती तलवार उभी केली.मात्र यात खर्या वाळू तस्करास कारवाई पासुन अलिप्त ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.या बहुचर्चित वाळू तस्करने हजारो ब्रॉस वाळू एका निर्जन स्थळी साठवून ठेवली आहे.प्रशासनाच्या कारवाईत चोर सोडून सन्यासाला फाशी देण्याचा घाट   घडविण्यात आल्याने मारेगाव प्रशासनावर पारदर्शकतेची साशंकता निर्माण झाली आहे.दांडगाव परिसरात  वेगळ्या अधिकार्याची नेमणूक करुन चौकशी केल्यास कारवाई करिता मोठे घबाड हाती लागू शकते.तसा सकारात्मक मारेगाव प्रशासनाकडून प्रयत्न व्हावा अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies