Type Here to Get Search Results !

मारेगाव तहसील समोरील उपोषणाची सांगता

मारेगाव तहसील समोरील उपोषणाची सांगता 
     मारेगाव : सचिन मेश्राम 
     शहरातील बहुचर्चित कॉईन बॉक्स कायम बंद करण्याची मागणी करीत येथील युवकाने मागील पाच दिवसापासून आमरण उपोषण करित दंड थोपटले होते.अखेर प्रशासकीय अधिकारी तथा सामाजीक तथा राजकीय  क्षेत्रातील पदाधिकारी यांनी सकारात्मक चर्चेने समेट घडवित उपोषणकर्ते आकाश कामटकर यांना सरबत देवून उपोषण मागे घेण्यात आले.
     मारेगाव येथील बहुचर्चित कॉइन बॉक्स मध्ये अनेक ग्राहकांची आर्थिक लुट होत असल्याची ओरड आहे.हाच धागा पकडुन मारेगाव येथील युवक आकाश कामटकर यांनी सदर व्यवसाय कायम बंद करण्याची मागणी करित मारेगाव तहसिल समोर आमरण उपोषण सुरु केले.
     आंदोलनाला तब्बल पाच दिवस लोटूनही तोडगा निघत नव्हता .दिवसागणिक उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली होती .त्यामुळे रविवारला रात्री मारेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारा नंतर उपोषणकर्त्याने परत आंदोलन सुरु केले.आंदोलना मुळे प्रशासन प्रभावित झाले.अशातच आज सोमवारला नायब तहसीलदार दिगांबरजी गोहोकार,उपनिरीक्षक अमोल चौधरी ,कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दुष्यंत जयस्वाल,मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे,युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विप्लव ताकसांडे,भाकपचे बंडू गोलर,रजनीकांत पाटील प्रफुल्ल आदे डॉ श्रीकांत तांबेकर यांनी उपोषण कर्त्याशी सांगोपान व तडजोडीची सकारात्मक चर्चा करुन उपोषण आंदोलनाला फुलस्टॉप मिळविण्यावर यश मिळविले.
    दरम्यान उपोषणकर्ते आकाश कामटकर यांना उपस्थितांनी सरबत देवून उपोषणाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies