Type Here to Get Search Results !

लग्न जुळत नसल्याचा पश्चाताप..युवकाने लावला गळफास

आत्महत्येची धग...

लग्न जुळत नसल्याचा पश्चाताप..
युवकाने लावला गळफास

🔸️एकदोन दिवसाआडील आत्महत्येने मारेगाव तालुका प्रभावित
🔸️डॉक्टर अभावी तब्बल सहा तास मृतदेह ताटकळत : सर्वत्र संताप
🔸️वेगाव येथील घटनेने हळहळ
मारेगाव : प्रतिनिधी
घरची आर्थिक परिस्थिती कणखर, नाट शेतजमिनीत भरघोस उत्पादन , सर्व आर्थिक व्यवहार त्याच्या हातात पण भावी सहचारिणीच त्याच्या जीवनात पुढे सरकत असतांना लग्न जुळण्याचे नाव घेत नसल्याने हा संताप , पश्चाताप अनावर होऊन थेट गळफास घेत जीवनाचा अखेर केल्याची हृदयद्रावक घटना आज शनिवारला सकाळी वेगाव येथे घडली.

राजेंद्र वामन गौरकार (३१) असे गळफास घेऊन जीवनयात्रा संपविलेल्या युवकाचे नाव आहे.आर्थिक परिस्थितीने सर्वच आलबेल असतांना मागील दोन वर्षांपूर्वी राजेंद्र याचे लग्न जुळून तुटले होते.तेव्हापासून लग्नाच्या बेड्या केव्हा पडेल यासाठी त्याचा अविरत प्रयत्न होता.मात्र लग्न जुळण्याचा योग येत नव्हता.इकडे मित्र परिवार गमतीने त्याला हिणवायचे.

शवविच्छेदनासाठी तब्बल सहा तास: आरोग्य विभागाचे लक्तरे वेशीवर
" वेगाव युवा शेतकऱ्याने गळफास घेतल्यानंतर मृतदेह सकाळी उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात आणला.मात्र येथे वैद्यकिय अधिकारी रजेवर असल्याने शवविच्छेदनसाठी तब्बल सहा तास नातेवाईकांना ताटकळत रहावे लागले.

नातेवाईकात या बेजबाबदार कळसाचा प्रचंड संताप व्यक्त होत असतांना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांनी थेट खासदार बाळू धानोरकर यांच्या कार्यालयात संपर्क साधला.जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कान टोचताच झरी आरोग्य अधिकारी मारेगाव येथे दाखल झाले.त्यानंतर तब्बल सहा तासांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.त्यामुळे शोकाकुल नातेवाईकांना असह्य त्रासाला समोर जावे लागले.या बेजबाबदार पणाच्या कळसाने आरोग्य विभागाचे लक्तरे वेशीवर टांगल्या जात आहे.नियमित वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली."

सर्वच गणगोत लग्नासाठी पराकाष्ठा करीत असतांना यंदाही लग्नाचा योग पुढे सरकत होता.याचाच पश्चाताप जिव्हारी लागला.मागील काही दिवसांपासून मानसिक मनोबल खचल्याचे त्याच्यात जाणवत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली.अशातच रात्रभर शेतात जागली जाऊन घरी आलेल्या राजेंद्र याने अवघ्या वेळातच शेत गाठले. शेतातील एका वृक्षाला गळफास घेत जीवनाचा अखेर केला.सालदार शेतात जाताच ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली.मृतकाच्या पश्चात आई , वडील असा आप्तपरीवार आहे.राजेंद्र यांच्या आत्महत्येचे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies