Type Here to Get Search Results !

बुद्धांच्या संघ हा साम्यवादाचे मॉडेल- गीत घोष

बुद्धांच्या संघ हा साम्यवादाचे मॉडेल- गीत घोष

● बुद्धजयंती निमित्त राजूरविकास संघर्ष समितीने घेतले शिक्षण शिबिर
● शिबिराला विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद

वणी : संतोष बहादूरे
२५०० वर्षांपूर्वी दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी निघालेले सिद्धार्थ गौतम यांनी विषमतेवर आधारीत वैदिक विचारप्रणालीला टाळून विज्ञानाला स्वीकारले व गौतम बुद्ध झाले. बुद्धांनी तर्काच्या कसोटीवर न उतरणाऱ्या ईश्वर व आत्म्याला नाकारले. ब्राह्मण्यवाद्यांनी सांगितल्या प्रमाणे वेद हे ईश्वरांनी रचले असे सांगितल्यामुळे विषमतावादी चातुर्वर्ण्य पद्धत लादून शोषणकारी अन्यायावर आधारित व्यवस्था निर्माण झाली होती. बुद्धांनी माणसाला माणसाशी जोडणारा समतावादी दृष्टीकोन देऊन दुःखाला कारणीभूत असणारी तृष्णा ( लालसा) सांगून तो दूर करणारा मार्ग सांगितला. संपत्ती बाळगणे हे लालसेचा प्रकार असल्याने बुद्धांनी संघातील भिक्खुंसाठी ८ वस्तूंच्या वर वस्तू ठेवण्यास मनाई केली व अतिरिक्त वस्तू ही संपूर्ण संघाची असल्याचे सांगितले. याचाच अर्थ आजच्या काळातील उत्पादनाची साधने ही मूठभरांच्या हातात न ठेवता ती राष्ट्रीय संपत्ती असावी, ही नवयुगातील बुद्धांचे साम्यवादाचे मॉडेल आहे, असे प्रतिपादन राजूर येथे झालेल्या शिक्षण शिबिराचे मार्गदर्शक म्हणून मा. गीत घोष यांनी केले.
बुद्धजयंतीच्या निमित्ताने बुद्धांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन विद्याथ्यांमध्ये रुजवण्यासाठी राजूर विकास संघर्ष समितीचे वतीने " बुद्धांच्या निरीश्वरवाद, अनात्मवाद व साम्यवाद" ह्या विषयावर शिक्षण शिबिराचे आयोजन दि. १८ मे रोजी येथील राष्ट्रीय विद्यालयात करण्यात आले होते. या शिक्षण शिबिराला शिक्षक म्हणून मा.गीत घोष लाभले होते. यावेळेस कॉ. कुमार मोहरमपुरी, राहुल कुंभारे, महेश लिपटे सर, सुनीता कुंभारे, हरेंद्र जंगले यांनीही आपले विचार व्यक्त केले. 

शिबिराला आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिराला प्रामुख्याने बंडू ठमके, सुयोग तेलतुंबडे, तृप्ती जुमले, निहारीक लोखंडे, स्नेहल नाखले, सरगम उल्लेराव, पौर्णिमा उल्लेराव, पायल मून, खुशी देवगडे, वैष्णवी थाटे, याना देवगडे, अनुष्का पेटकर, यश वेले, समृद्ध तेलतुंबडे, कुणाल काळे, अंश धोटे, प्रवर्तक भोंगाडे, साहिल कांबळे, हर्शल बलकी, अनिकेत मून, अरहंत मुनगाटे, अमर्त्य मोहरमपुरी, सुमित नगराळे, पियुष कांबळे आदी उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies