खासदार बाळू धानोरकर यांचे हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
🔸अध्यक्ष मारोती गौरकार यांचे निवासी मान्यवरांचे स्वागत मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यात विविध ठिकाणाच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा खासदार बाळू धानोरकर यांचे हस्ते गुरुवारी पार पडला.
पांढरकवडा (पिसगाव) ते 'डोलडोंगरगाव व हिवरा , गोरज ते दांडगाव रस्त्याचे भूमिपूजन खासदार धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.यावेळी माजी आमदार वामनराव कासावार , मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे , जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई खंडाळकर , आशिष कुळसंगे , गणुजी थेरे , जिल्हा सरचिटणीस रमण डोये , तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याने नागरिकांचे येजा करणे दुरापास्त झाले होते.मागील काही वर्षांपासून परिसरातील नागरिकांच्या मागणीला कलाटणी मिळत असल्याने हे बेदखल रस्ते दिवास्वप्न ठरत होते.या गंभीर प्रश्नांची खासदार बाळू धानोरकर यांनी दखल घेत पूर्णत्वास नेण्याचे अभिवचन कृतीत उतरविले.अवघ्या दिवसातच रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याने येथील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
छोटेखानी भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमापुर्वी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मारोती गौरकार यांचे पिसगाव निवासी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.