करणवाडी जवळ दुचाकीला अपघात
🔸दोन गंभीर जखमी
मारेगाव :- संतोष बहादुरे
करणवाडी जवळ दुचाकी रस्त्यावरील दुभाजकावर आदळून वणीतील दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज आज दि.१० सोमवार रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे.
वणी शहरातील गोपाल कुरवडे (३०) खाती चौक व सचिन बारगडे (२८) शाम टॉकीज हे दोघे तरुण काम आटोपून वणीकडे येण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच ३४ क्यू ४३६८ ने सायंकाळी ७ वाजताचे सुमारास वणीकडे येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने करणवाडी जवळ असलेल्या महामार्गावरील दुभाजकावर त्यांची दुचाकी आदळली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती लोकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दोघांनाही मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गोपाळ कुरवडे हा गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू होती.