रानडुकराच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी
कुंभा :- प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या नगार रोड लगत गुरे चारत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याची घटना आज ११ जाने रोजी साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
वसंत महादेव मुरके रा. कुंभा असे जखमी गुरख्याचे नाव आहे. तो आज नियमीतपणे सकाळी पशुधन घेऊन नगारा रस्त्यालगत चारत होता. या दरम्यान अचानक रानडुकराने त्याच्यावर हल्ला चढवला. त्यात त्याच्या पाठीला व गुप्तांगाला जबर मार लागला . त्याला तात्काळ उपचारार्थ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .मात्र प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.