मारेगाव नगरपंचायत चा शिलेदर कोण ?
🔸मतदार राजा झाला बोलका
🔸शहरासह तालुक्यात चर्चा
मारेगाव :- कैलास ठेंगणे
नगरपंचायत निवडणूक होऊन काही कालावधी लोटला. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. मात्र मतदार राजा आता बोलका होत असल्याने शहरासह तालुक्यात चर्चांना पेव फुटले आहे. यातच शहरातील तीन प्रभागातील निवडणूक स्थगिती नंतर त्यांची रणधुमाळी सुरू झाली. या रणधुमाळी मध्ये मतदारराजाच्या बोलक्या प्रतिक्रियाचा परिणाम पडणार असल्याचे मत राजकीय कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.
मारेगाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकासाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती . कोट्यावधीचा निधी शहराच्या सार्वजनिक विकासाकरिता आला. मात्र शहरातील आरोग्यासह विविध प्रश्नाला बगल देत ,केवळ' 'स्व' हित साधले गेले . विकास निधीचा स्वतःची संपत्ती प्रमाणे वापर करून मर्जीप्रमाणे विल्हेवाट लावल्या गेली. या सर्व बाबीकडे सुज्ञ मतदाराचे तीष्ण नजर कायम होती. मात्र सत्तेची मस्ती पुढे सुज्ञ मतदारांचे काही चालले नाही. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी साम-दाम-दंड-भेदा चा वापर करीत मतदारांना भूल भुलैया करण्याचा प्रयत्न केला. या भूल भुलैयाना मतदारांनी साथ घातली नसल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया मतदार व्यक्त करीत आहे. त्यामुळे नगरपंचायत मध्ये कोण्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.