तेंदूपत्ता बोनस व आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी मारेगावात आमरण उपोषण
🔹 बोटोणी वासीयांचा पुढाकार
बोटोणी : राहुल आत्राम
तालुक्यातील बोटोणी येथील मागील पाच वर्षांपासून तेंदूपत्ता बोनससाठी हुलकावणी मिळत असून हा बोनस तात्काळ प्रदान करण्यात यावा सोबत बोटोणी येथील आरोग्य उपकेंद्र नियमित सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बोटोणी येथील नागरिकांनी उपोषणाचा एल्गार दि.२१ सप्टेंबर पासून पुकारला आहे.
मागील २०१५ पासून येथील मजुरांचा तेंदूपत्ता बोनस कायम रखडला आहे.मागील पाच वर्षात सिरतल ट्रेडिंग कंपनी पांढरकवडा यांनी सन २०१५ ते २०१७ पर्यंत कंत्राट घेतला त्यानंतर नागपूर येथील अपरोज कंपनीने सन २०२० पर्यंत तेंदूपत्ता खरेदीचा कंत्राट घेतला होता.सन २०१५ मध्ये बोटोणी ग्रामपंचायतची पेसा अंतर्गत कायद्यात रूपांतर झाले.मात्र या ग्रामपंचायत मध्ये तात्कालीन सचिव व सरपंच यांच्या बेताल भूमिकेने किमान १२० मजूर तेंदूपत्ता बोनस पासून वंचित राहिले.याबाबत वारंवार विचारणा केली असता टोलवाटोलवी चे उत्तरे देऊन मजुरांना आजतागायत घुमजाव करण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे.
सदर मजूर मागील पाच वर्षांपासून बोनस साठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे.मात्र सकारात्मक न्याय मिळत नसल्याचे दिसत असल्याने अखेर या बोनस साठी व येथील आरोग्य उपकेंद्र स्थानांतरण करण्यात आल्यागत ते पूर्ववत सुरू करण्यासाठी
पंचायत समिती समोर आजपासून उपोषण सुरू केले असून भास्करराव सीडाम, केशव भसारकर, केशव खंडाळकर, दिवाकर आस्वले यांनी आंदोलनाचे दंड थोपटले आहे.
आपली मागणी योग्यच,👍
उत्तर द्याहटवा