घोन्सा परिसरात विजेचा लपंडाव सुरु
तालुका प्रतिनिधी:- राहुल वाटेकर वणी तालुक्यातील घोन्सा परिसरात रोजच्या विजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त झाले आहे.त्यामुळे परिसरातील विज पुरवठा सुरळीत करा,या प्रमुख मागन्या परिसरातील जनतेतून होत आहे विधुत विभागाला वारंवार निवेदन देण्यात आले मात्र निवेदनला कचरा पेटीचा मार्ग दाखवला जातो.
घोन्सा विभाग परिसरात 10 पेक्षा जास्त गावाचा समावेश आहे.या परिसरात रोजच्या विजेच्या लपंडावामुळे विधुत ग्राहक नाकी नऊ येउन वैतागले आहे.तसेच या परिसरातील शेतकऱ्यांचा कृषी विधुत पुरवठा सुद्धा सिंगल फेज वर असल्याने बोरवेल ला पाहिजे त्या प्रमाणात वीज पुरवठा मिळत नसल्याने भविष्यात ओलितांचे पिके सुद्धा धोक्यात येण्याचे संकेत आहे. मात्र विधुत विभागाची जनते कडे पाट आहे हे मात्र खरे