काय सांगता! इथे एकाच झाडाला येतात दोन रंगाची फुले, जाणून घ्या खासियत
तालुका प्रतिनिधी :- मुकेश फुलझेले
सामान्यपणे असं मानलं जातं की, एका झाडावर एकाच प्रकारचं फुल लागू शकतं. पण असं अजिबात नाहीये. मारेगाव तालुकात असंही ठिकाण आहे जेथील झाडावर दोन रंगाची फुले लागतात.
खरंतर यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण नक्कीच आहे, पण हे सत्य आहे.
कोलगाव येथे एका झाडाला चक्क दोन रंगांची फुले आली आहे , या झाडावर लाल व पांढरी फुले लागतात. अशी या अनोख्या झाडाची कल्पना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. हि घटना घडली आहे मारेगाव तालुक्यातील कोलगाव या गावी,
सविस्तर असे की सुरज निमसकर याना फुलझाडे व इतर झाडा वर खुप आपुलकी आहे. त्यांचा याच इच्छेतून त्यानी आपल्या घर परिसरात छोटी सी बाग तयार केली, व त्या बागेच मागिल कही महीन्या पासुन संगोपन सुरु आहे. त्याचेच फळ मनावे काही झाडांना फुले आली विशेष असेकी त्या फुल झाडामध्ये असे एक फुलझड आहे ज्याला दोन रंगाची फुले लागली. आश्चर्याचा धक्का देणारी ही महीती परिसरातील लोकान मिळताच बघण्यासाठी त्यांच्या छोट्याशा बागमध्ये लोकांची ये-जा सुरू झाली. सुरज यांना पहिले पासून च वृक्ष लागवडी ची आवड आहे.