आ. संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय कळमनुरी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा...!
हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब* यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय कळमनुरी येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सकाळी ९:०५ मिनिटांनी झेंडावंदन झाल्यानंतर आमदार संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय कळमनुरी येथे कोरोना योध्यांचा सन्मान, शिधापत्रिका वाटप तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष गणाजी बेले उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे साहेब, तहसीलदार मयुर खेंगळे साहेब, सहसंपर्कप्रमुख राजेंद्रजी शिखरे, माजी जि.प. उपाध्यक्ष राजेश्वरराव पतंगे, जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव जी मुंढे, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम प स गटनेते गोपू पाटील, संजय मंदाडे, नगरसेवक अतुल बुर्से,सुहास पाटील, राजू संगेकर, ऍड रवी शिंदे,शिवराज पाटील, मयूर शिंदे,पिंटू गडदे, दिनकर बांगर ,शिवम नाईक व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.