मित्राची मयत करून आंघोळीला नदीवर गेलेल्या ३८ वर्षीय विवाहित युवकाचा बुडून मुत्यु
दांडगांव येथील घटना
प्रतिनिधी/ सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील दांडगांव येथील २६वर्षीय प्रफुल्ल मत्ते रा. दांडगांव यांनी १३आँगस्ट रोज शुक्रवारला रात्रीच्या दरम्यान गावा शेजारी असलेल्या नदीच्या बंधाऱ्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती.
प्रफुल्ल यांच्या मयतीच्या अंतिम संस्कार करण्यासाठी १४ आँगस्ट रोजी गावातील काही नागरिक नदी शेजारी उपस्थित होते. प्रफुल्ल यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार होताच काही नागरिकांनी रितीरिवाजानुसार नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले असता अशातच पंढरी भाऊराव चिंचोलकर रा. दांडगांव हा नदी मध्ये आंघोळ करण्यासाठी उतरला असता पंढरी याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या डोहात गेल्याने येथील उपस्थित नागरिकांनी पंढरी याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता पाण्याच्या डोहात पंढरी गेल्याने चार ते पाच लोकांनी पाण्यात उतरून पंढरी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता पंढरी पाण्याच्या खोल डोहात गेल्याने एकाच्या जागी ५ ते ६ नागरिक मृत्युमुखी पडले असते.
एकाच नदीवर दोघाचे जिव गेल्याने गावातील या धक्कादायक घटनेने गावातील हळहळ व्यक्त केले जात आहे.
पंढरी यांच्या पश्चात आई ,वडील पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार पाठिमागे आहे