Type Here to Get Search Results !

अट्टल दुचाकी चोरट्याला अटक, ७ मोटारसायकल जप्त

अट्टल दुचाकी  चोरट्याला अटक, ७ मोटारसायकल जप्त

यवतमाळ शहर पोलिसांची कारवाई
 
  सचिन मेश्राम

यवतमाळ : यवतमाळ शहर पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या सात दुचाकी जप्त केल्या आहे.  स्नेहल प्रकाश भरणे  (३२) रा. पारडी ता.कंळब असे आरोपीचे नाव आहे.यवतमाळ शहरातील हिरो होडा दुचाकी एम एच२९ ए.एच २४६० चोरी गेली असल्याचा  यवतमाळ शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या  अनुषंगाने यवतमाळ शहर पोलीस  तक्रारीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.  स्नेहल  प्रकाश भरणे याला यवतमाळ शहर पोलिसांनी चौकशी साठी  ‌ ताब्यात घेण्यात आले होते चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.  आरोपी कडून एकूण सात मोटारसायकल अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये किमतीचे दुचाकी वाहन जप्त केले  स्नेहल भरणे याच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीस अटक  करण्यात आली. पुढील तपास यवतमाळ शहर पोलिस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर,   यांच्या  मार्गदर्शनाखाली यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण भाकडे, हवालदार गजानन क्षीरसागर, पोलीस शिपाई महेश मांगुळकर, अमित कदम , अल्ताफ शेख, मिलिंद दरेकर, अंकुश फेडर, राजकुमार कांबळे, निलेश घोसे  यांनी  ही कारवाई केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies