वीजचोरीचा आकडा काढल्याने लाईनमनला ठार मारण्याची धमकी
युसूफ वडगावला कार्यरत लाईनमन गणेश इंगळे यांना दत्तात्रय सौंदणेने दिली धमकी
केज : केज तालुक्यातील युसूफ वडगाव येथे कार्यरत असलेले लाईनमन गणेश इंगळे यांना घरावरील लाईटचा आकडा का काढला म्हणून लाईनमनला मोबाईल वरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
केज तालुक्यातील युसूफ वडगाव येथे कार्यरत असलेले लाईनमन गणेश इंगळे यांनी ता. ५ जुलै रोजी गावातील दत्तात्रय सौंदने यांनी वीजचोरी करण्यासाठी वीजवाहिन्या आकडा टाकून घेतलेला वीज पुरवठा करणारा आकडा काढून टाकला. म्हणून त्याचा राग येऊन दत्तात्रय सौंदने यांनी ता. ६ जुलै रोजी मोबाईल फोन वरून लाईनमन गणेश इंगळे यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. लाईनमन गणेश इंगळे यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात दत्तात्रय सौंदने यांच्याविरुद्ध अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे