Type Here to Get Search Results !

आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून५ सदस्यांचा खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशी द्या: बिरसा फायटर्सची मागणी

आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून५  सदस्यांचा खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशी द्या: बिरसा फायटर्सची मागणी 

     सचिन मेश्राम

रत्नागिरी: नेमावर जि. देवास(मध्य प्रदेश) येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्या व परिवारातील 5 सदस्यांचा खून करणाऱ्या सामूहिक हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंद्र चौहान व इतरांना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा व बिरसा फायटर्सचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनोज पावरा यांनी भारताचे राष्ट्रपती यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
        निवेदनात म्हटले आहे की,  काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश राज्यातील देवास जिल्ह्याच्या नेमावर या गावात गावातीलच हुकूमशहा स्थानिक नेता, नराधम वृत्तीचा सुरेंद्र चौहान व त्याच्या अन्य साथिदारांनी आदिवासी समाजातील एकाच परिवारातील 5 सदस्यांचा निर्घृण खून करून सामुहिक हत्याकांड घडवून आणले. आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने स्वत:च्याच शेतात 10 फूटाचे खड्डे करून, सर्व प्रेतांची विल्हेवाट लावली. या घटनेने संपूर्ण देशाची मान शरमेने झुकली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या नराधम, बदमाशांना निर्भया खटल्याप्रमाणेच तात्काळ फाशी देण्यात यावी. जेणेकरून अशा अमानवी, क्रूर घटनांना पायबंद बसेल. 
           देशात आदिवासी समाजावर दिवसेंदिवस बलात्कार, अत्याचार, अन्याय, खून यांसारखे अमानवी प्रकार वाढतच आहे. मागील 5-6 दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्याच्या नेमावर या गावातील खूनी, नराधम भामटा सुरेंद्र चौहान याने आदिवासी समाजातील मुलींवरील प्रेम प्रकरणातून मुलीसह अन्य अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या आईसह लहान बालक असे मिळून 5 सदस्यांचा अत्यंत क्रौर्यपणे खून केला. आणि प्रेते लवकर कुजावित म्हणून युरीया खताचा वापर केला. तब्बल दीड महिन्यानंतर सदर घटना ऊघडकिस आली. देशात सर्वांना समान न्याय या तत्वावर आदिवासी मुलींना (समाजाला) न्याय मिळवून देण्यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रैक कोर्टात चालून नराधम, खूनी, बलात्कारी सुरेंद्र चौहानसह त्याला मदत करणाऱ्या इतरांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी.अशी मागणी संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा  बिरसा फायटर्स व मनोज पावरा राज्याध्यक्ष महाराष्ट्र बिरसा फायटर्स यांनी भारताचे राष्ट्रपती यांच्या कडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies