Type Here to Get Search Results !

घरकुलचा दुसरा हप्ता मागण्यास गेलेल्या महिलेला केली शारीरिक सुखाची मागणी

घरकुलचा दुसरा हप्ता मागण्यास गेलेल्या  महिलेला केली  शारीरिक सुखाची मागणी 

 गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठा कडे निवेदन देवून केली 
 
प्रतिनिधी/सुधाकर मेश्राम

 मारेगाव तालुक्यातील मौजा म्हैसदोडका येथील   कोलाम जमातीतील  आदिवासी महिला ही मागील पंचवीस वर्षापासून म्हैसदोडका येथील वार्ड क्रमांक २ मधील घर क्रमांक ५७मध्ये कुळा मातीच्या बांधलेल्या स्वतःच्या घरात राहत असताना सन २०१८-१९ या कालावधीत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सौ. फुलवंती दौलत आत्राम या आदिवाशी महिलेला  घरकुल मंजूर झालेल्या यादी मध्ये  नाव  आल्याचे पत्र  गटविकास अधिकारी, यांनी दि. १६/४/२०१९च्या लेखी पत्राद्वारे कळविले व घरकुल संदर्भात आधार कार्डची  झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स १००रु.स्टॅम्प पेपरवर करारनामा या पूर्वी घरकुलाचा लाभ न मिळाल्याचे प्रमाणपत्र व वार्ड क्र.२मधील ५७क्रमांकाच्या मालकी जागेचा नमुना आठ-अ ते प्रमाणित असलेलें व  कुळा मातीच्या  घराचा कुटुंबासह फोटो  कागदपत्रे बनवून ग्रामपंचायत सचिव गिरीश येनगंटीवार यांच्या कडे फाईल पिडीत महिलेने सदर केली.त्या अनुषंगाने संबंधित सचिवाने सर्व कागद पत्राची पडताळणी केली व जागेची पाहणी करून सदर फाईल सचिव गिरीश येनगंटीवार यांनी पंचायत समिती कार्यालयात  कागदपत्र सह सादर केली,   कागदपत्र ऑनलाइन झाल्याने पिडीत महिलेला घरकुलचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये महिलेच्या बैक  खात्यात जमा झाला त्या जागेचा जिओ टेकिंग बनले त्यानंतर या महिलेने त्या घरकुलाचे स्लॅफ पर्यंत बांधकाम झाले असल्याने महिलेने घरकुलचा दुसरा हप्ता  मिळण्यासाठी पिडीत महिलेने सदर प्रकरण गटविकास अधिकारी मनोहर  नाल्हे-  पंचायत समिती मारेगाव यांना शुक्रवार दिनांक २८मे रोजी प्रत्यक्ष भेटून विनंती अर्ज दिले तेव्हा गटविकास अधिकारी यांनी चार दिवसात तुमच्या बैक खात्यात दुसरा हप्ता जमा होईल असे  आश्वासन दिले होते. पंधरा दिवस लोटून सुद्धा दुसरा हप्ता जमा झाला नसल्याने  गटविकास अधिकारी  मनोहर नाल्हे हे  मंगळवार दिनांक १६जुन रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान म्हैसदोडका येथील घरकुलच्या कामाची चौकशी करण्यासाठी आले  असता मंगळवार दि.१५जुन रोजी  सचिव व ग्रामपंचायत शिपाई गायधन हे त्या पिडीत महिलेच्या घरी जाऊन महिलेला सांगितले गटविकास अधिकारी नी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये बोलावले त्यांच्या सांगण्यावर पिडीत महिलेने  विश्वास ठेवून सचिवाच्या व शिपायाच्या  सांगण्यानुसार सदर महिला ग्रामपंचायत मध्ये गेली त्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये बसुन असलेले  गटविकास अधिकारी मनोहर नाल्हे   यांनी त्या महिलेला आवाज देऊन ग्रामपंचायत मध्ये बोलाविले त्यावेळी गटविकास अधिकारी पिडीत महिलेला  तुमच्या घरकुलचा दुसरा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला थोडा वेळ लागेल तुम्हाला एक गोष्ट बोलू का? तुम्हाला राग तर! येणार नाही ना?  तुमची अंगकाठी, पर्सनालिटी  मस्त दिसत आहे. अर्धा-एक तास माझ्यासोबत माझे समाधान करशील का?  अशी शारीरिक सुखाची मागणी केली, त्याच वेळी त्या आदिवासी महिलेने गटविकास अधिकारी यांच्या कानशिलात थापड  लगावली मला घरकुलचा दुसरा हप्ता मिळाला तरी ठीक नाही मिळाला तरी ठीक पिडीत महिलेला शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या तुझ्यासारख्या गटविकास अधिकारी ला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी खाणकावुन ग्रामपंचायत मधून पिडीत महिला घरी जाऊन घडलेली हकीगत पतीला सांगितली त्यानंतर दिनांक १५जुन रोजी सांयकाळी मारेगाव पोलीस स्टेशनला अर्ज सादर केला त्या अर्जावरून त्या पिडीत महिलेला दिनांक२२जुन रोजी पोलीस स्टेशनमध्ये बोलविले दोन तास ती महिला पोलीस स्टेशनच्या  आवारात बसुन असल्याने त्या पिडीत महिलेला कोणत्याही पोलीस शिपाई किवा अधिकारी यांनी पिडीत महिलेकडे विचार पुस करण्यासाठी आले नसल्याने व बयान सुद्धा पिडीत महिलेचे  नोंदविलेल नसल्याने सहा सात दिवस लोटून सुद्धा कोणताही पोलीस अधिकारी चौकशी साठी  आलेले नसल्याने पोलीस अधिकारी माझे बयान घेण्यास गटविकास अधिकाऱ्यावर  कलम ३५४ ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल  करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत पिडीत महिलेने वरिष्ठांना निवेदन देवून मंगळवार दि.२०जुलै २०२१रोजी  मारेगाव पोलीस स्टेशन समोर आपल्या कुटुंबासह अमरण उपोषनास बसत  असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, उपविभागीय अधिकारी, वणी व तहसीलदार साहेब मारेगाव यांना अर्जद्वारे कळविले आहे.या आमरण उपोषणाला सर्व आदिवासी समाजाच्या संघटनांनी पाठिंबा असल्याचे बाबूलाल जी सिडाम,रा.बोटोणी व सुधाकरराव मेश्राम,बळीराम आत्राम, अनिल गेडाम, जयपाल पेंदोर, परचाके गुरुजी, भोजराज चांदेकर, जित्रुजी परचाके, अर्जुन तोडासे, विजय कोडापे,भास्कर सिडाम, तुळसाबाई कुळसंगे, जीवन कुळसंगे, संगीता रामपूरे व संगीता कोडापे यांनी आमचे प्रतिनिधीशी उपोभंषणास पाठिंबा देत असल्याचे चर्चेतून सांगितले आहे.
  प्रतिक्रिया गटविकास अधिकारी -मनोहर  नाल्हे
        मी म्हैसदोडका येथे गेलो नाही  महि लेने दिलेली  ही सदर्हु  तक्रार ही आकसापोटी व खोटी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies