हुणाखांब येथे खावटी अनुदान योजने अंतर्गत खावटी किट वाटप ..
प्रतिनिधी = (मोलगी ) हुणाखांब येथे आदिवासी विकास विभागामार्फत गरजू व गरीब आदिवासी लोकांना अन्नधान्य, कडधान्य व इतर जिवनावश्यक वस्तुंची किट सरपंच राज्या वसावे, मुख्याध्यापक भगवान महिरे, ग्र ग्राम पंचायत सदस्य रविंद्र राऊत, उमेश सुर्यवंशी, महेश सावळे, फुर्ता राऊत, दिलीप पाडवी , वेस्ता वसावे यांच्या हस्ते खावटी किट वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या शेवटचा टोकावर असलेले गाव म्हणजे हुणाखांब हे गाव अति दुर्गम भागात असून डोंगर माथ्यावर वसलेले आहे या गावाहून दळणवळणाला कोणतेही शासकीय वाहन नाही . तेथील लोक विकासा पासून कोसो दुर आहेत . जमाना आश्रम शाळेचे कर्मचारी यांना प्रकल्प अधिकारी सो . यांनी आदिवासी कुंटुबाचा सुर्वे करण्याचे काम दिले होते . जमाना ते हुणाखांब
हे अंतर ७० ते ८० किलोमिटर आहे . शासन नियमानुसार पाच कि.मी. अंतरात सर्वे करण्याचे काम दयावे असे असतांना देखील या कर्मचाया ना हुणाखांब का दिले हे एक न उलग ळलेले कोडे आहे .तरी असे असले तरीही या कर्मचा-या अति दुर्गम आदिवासी भागात किट पचवण्याचे एक महान कार्य करित आहे तरी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.