महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघाच्या मारेगाव तालुकाध्यक्षपदी प्रशांत भाऊ नांदे यांची निवड
सचिन मेश्राम
मारेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरपंचायत उपाध्यक्ष श्री. प्रशांत भाऊ नांदे महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघाच्या मारेगाव तालुकाध्यक्षपदी प्रशांत नांदे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य धोबी (परटी) समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी.डी.सोनटक्के , कार्याध्यक्ष अनिल शिदे , मुख्य महासचिव जयराम वाघ,विदर्भ अध्यक्ष शंकरराव परदेशी, विदर्भ महिला अध्यक्ष सौ.वैशालीताई केलझरकर विदर्भ महासचिव राजु तुरणकर विदर्भ सहसचिव भास्कर राऊत व विदर्भ युवा अध्यक्ष चंद्रकांत थुंकेकर राज्यस्तरीय बैठक घेवुन दि.१७जुलै रोजी महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघाच्या मारेगाव तालुकाध्यक्षपदी प्रशांत भाऊ नांदे यांना महाराष्ट्र राज्य धोबी (परटी) समाज महासंघाच्या पदधिकारी
यांनी प्रशांत भाऊ नांदे यांना नियुक्ती पत्र देऊन मारेगाव युवा तालुका अध्यक्ष शुभम धानोरकर व मारेगाव उपाध्यक्ष पदी आकाश खामनकर याची निवड करण्यात आली पुढील वाटचाली करता शुभेच्छा देण्यात आल्या व मारेगाव तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.