Type Here to Get Search Results !

राजाभाऊ सरनोबत यांची बिरसा फायटर्स कोकण विभाग कार्याध्यक्ष पदी निवड

राजाभाऊ सरनोबत यांची बिरसा फायटर्स कोकण विभाग कार्याध्यक्ष पदी निवड
 
 ठाणे : राजाभाऊ सरनोबत  यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या कोकण विभाग  कार्याध्यक्ष  पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय  अध्यक्ष सुशिलकुमार पावरा  यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२जुलै रोजी ऑनलाईन सभा घेण्यात आली. या सभेत कोकण विभागातील  पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बिरसा फायटर्स चे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी राजाभाऊ सरनोबत  यांची कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे घोषित केले. तत्पूर्वी राजाभाऊ सरनोबत   यांनी   बिरसा फायटर्स  संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांनी सुद्धा राजाभाऊ सरनोबत यांना कोकण विभाग कार्यकारिणीत घ्या,असे सुचवले. राजाभाऊ सरनोबत हे आदिवासी संघर्ष समिती मुरबाड तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होते.त्याचबरोबर आदिवासी एकता परिषदमध्येही काम करत होते. मुरबाड तालुक्यात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे राजाभाऊ सरनोबत हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी एस टी महामंडळात नोकरी केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग भाग त्यांच्या साठी अधिक परिचित आहे. त्यांची   समाजाबद्धल काम करण्याची तळमळ लक्षात घेऊन त्यांना कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
               राजाभाऊ सरनोबत  यांची कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदी निवड   झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनोज पावरा,उपाध्यक्ष राजेश धुर्वे,महासचिव  राजेंद्र पाडवी,महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, राज्य प्रवक्ता रोहित पावरा,कोषाध्यक्ष दादाजी बागूल,हसन तडवी प्रसिद्धी प्रमुख, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, साहेबराव कोकणी नंदुरबार जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी,संतोष वळवी शहादा तालुका अध्यक्ष,प्रितेश पावरा नाशिक विभाग प्रसिद्ध प्रमुख,गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार,जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष धुळे इत्यादी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.राजाभाऊ सरनोबत  यांची कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुभेच्छा देणा-या सर्व मित्रांचे राजाभाऊ सरनोबत यांनी आभार मानले आहेत.
         यापूर्वी सुद्धा आपण  आदिवासी समाजाच्या विविध महत्त्वाच्या  समस्या  सोडविण्यासाठी काम केले आहे व आता युवा मंडळी सोबत  आपण काम करणार असल्यामुळे अत्यंत आनंद होत आहे. सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांच्या कार्यांने मी प्रभावित असून त्यांच्या सोबत मला काम करायला नक्कीच  आवडेल. असे यावेळी नवनियुक्त कोकण विभाग  कार्याध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी सांगितले.*राजाभाऊ सरनोबत यांची बिरसा फायटर्स कोकण विभाग कार्याध्यक्ष पदी निवड* 
 
 ठाणे : राजाभाऊ सरनोबत  यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या कोकण विभाग  कार्याध्यक्ष  पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय  अध्यक्ष सुशिलकुमार पावरा  यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23/07/2021 रोजी ऑनलाईन सभा घेण्यात आली. या सभेत कोकण विभागातील  पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बिरसा फायटर्स चे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी राजाभाऊ सरनोबत  यांची कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे घोषित केले. तत्पूर्वी राजाभाऊ सरनोबत   यांनी   बिरसा फायटर्स  संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांनी सुद्धा राजाभाऊ सरनोबत यांना कोकण विभाग कार्यकारिणीत घ्या,असे सुचवले. राजाभाऊ सरनोबत हे आदिवासी संघर्ष समिती मुरबाड तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होते.त्याचबरोबर आदिवासी एकता परिषदमध्येही काम करत होते. मुरबाड तालुक्यात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे राजाभाऊ सरनोबत हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी एस टी महामंडळात नोकरी केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग भाग त्यांच्या साठी अधिक परिचित आहे. त्यांची   समाजाबद्धल काम करण्याची तळमळ लक्षात घेऊन त्यांना कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
               राजाभाऊ सरनोबत  यांची कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदी निवड   झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनोज पावरा,उपाध्यक्ष राजेश धुर्वे,महासचिव  राजेंद्र पाडवी,महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, राज्य प्रवक्ता रोहित पावरा,कोषाध्यक्ष दादाजी बागूल,हसन तडवी प्रसिद्धी प्रमुख, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, साहेबराव कोकणी नंदुरबार जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी,संतोष वळवी शहादा तालुका अध्यक्ष,प्रितेश पावरा नाशिक विभाग प्रसिद्ध प्रमुख,गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार,जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष धुळे इत्यादी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.राजाभाऊ सरनोबत  यांची कोकण विभाग  कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुभेच्छा देणा-या सर्व मित्रांचे राजाभाऊ सरनोबत यांनी आभार मानले आहेत.
         यापूर्वी सुद्धा आपण  आदिवासी समाजाच्या विविध महत्त्वाच्या  समस्या  सोडविण्यासाठी काम केले आहे व आता युवा मंडळी सोबत  आपण काम करणार असल्यामुळे अत्यंत आनंद होत आहे. सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांच्या कार्यांने मी प्रभावित असून त्यांच्या सोबत मला काम करायला नक्कीच  आवडेल. असे यावेळी नवनियुक्त कोकण विभाग  कार्याध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies