गुरुपौर्णिमे निमित्त महाप्रसाद वाटप
- स्वरधारा ग्रुप चे आयोजन
मारेगाव:- शहरातील स्वरधारा ग्रुप च्या वतीने गुरुपौर्णिमे निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येथील मार्डी चौकात महाप्रसाद वाटपचा कार्यक्रम घेवुन गुरुपौर्णिमा उत्सव सन साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम मारेगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या हस्ते साईबाबा च्या प्रतिमेचे पुजन व हारारपन करून महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
स्वरधारा ग्रुप च्या वतीने शहरात नेहमी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाप्रसाद वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला.शहरातील हजारो नागरिकांनी या महाप्रसाद चा लाभ घेतला.
यावेळी स्वरधारा ग्रुप चे नागेश रायपूरे,अशोक कोरडे,विवेक बोबडे,सचिन देवाळकर,आकाश येरमे,श्रीकांत सांबजवार,निखिल कोरडे,हरी नेहारे,तुषार शेंडे,मोहन शेंडे,संदीप आत्राम,शेख इफतेखार,विनीत जयस्वाल,गजानन मुके,विशाल परचाके आदींनी परिश्रम घेतले.